Tuesday, July 13, 2010

लेख

                                     खरच प्रेम आंधळ........?


            त्याचा आवाज ऐकला की तिला कस नुस वाटायच, वाटायच ऊठाव नि सांगावे
त्याला सर्वकाही, जे तिला वाटतं . पण ............ रंग मंचावर ती उभी असायची आणि तो पाडद्या मागे ऊभा राहून गायचा. नाटक संपल्यावरही सर्वांसमोर त्याच्या सोबत ती बोलू शकत न्हवती.
                                       पण तिने आज ठरवले होते की, आपण बोलायच, त्याला सांगायचं जे तिला वाटायच तो हो म्हणेल की नाही या विचरने तिला झोप सुद्धा लागत नसे तो हो म्हणेल, तो हो म्हणेल या विचरने ती गालातच हसत आसे आणि तो नाही म्हणेल, असा विचार येताच मुसुमुसु अश्रुढाळत असे.  ती त्याचा बरोबर लग्नाची स्वप्ने रंगवित असे, आणि हे सर्व ती त्याला सांगणार होती. आणखी काही, बरेच काही......... नाटक संपलं. तीने त्याला हाक  मारली, जयंत.............
                                  काठीच्या आधाराने रस्ता चाच्पडत चाललेला जयंत क्षणभर थबकला त्याला तो आवाज ओडखीचा होता. पण या आवाजाने त्याला कधी साद दिलेली नव्हती .'जयंत इकड़े ये'. विचाराच्या तंद्रित बुडालेला जयंत स्वतःला साम्भाडून तिच्याकडे वळला..' काय निशा आज पहिल्यांदाच तू मला हाक मरलिस. काही विशेष ? ' 'होय' ती म्हणाली . 'सांगना........' नको , इथे नको क्यान्टिंग मधे जाऊ. दोघेही क्यान्टिंग मधे वळले, या वेडी मात्र निशा त्याला आधार देत होती. 'बोल...' तो म्हणाला . 'जयंत मला तुझा.............! तीचे ओठ थरथरले तो नाही म्हणेल या विचरने डोळे भिजले. 'निशा गप्प का झाली' . तीने स्वतःला सावरून 'मला तुझा आधार व्हायचय जयंत' एका शवासत तीने सार काही सांगितले. तिच्या हृदयाची स्पंधन वाढली होती. ती श्वास रोखून त्याच्या कड़े नुसतीच बघत होती . त्याला तिच्या बोलण्याचा आशय कळला होता . निशा ! 'ह...........'
                          
                                      गहिवर्ल्याने तिचा आवाज घोगरा झाला. त्याने बस तीला साद दिली. तो पुन्हा म्हणाला निशा 'माझ्यात तुला असं काय दिसले ग................?' 'तू , तुझा आवाज, तुझा स्वाभाव' निशा म्हणाली. 'तुला माहित आहे निशा, मी अंध आहे. नाही निशा मला तुझं आयुष्य संपवायाच नाही. तुला सांगतो निशा, हे अंधपण फार मोठा श्राप आहे. आणि तू डोळस असून सुद्धा स्वतःच्या पायावर कुर्हाड़ मारायला निघालीस' , तो स्तब्ध झाला.
                
                 ' निशा ........... .. . . . .' 'निशा.........' ओ द्यायला ती तिथून कधीच निघून गेली होती . त्याला वाटलं , कदाचित आपण नकार दिल्यामुळ तीला राग आला असावा. पण तीने ठरवलच होतं की , लग्न करेन तर जयंत बरोबरच, तसं तीने घरच्याना सुद्धा सांगितले होते . लग्न झाल्यानंतर पति-पत्नी मधील कुणीही आघळ झालं तर दूसरी व्यक्ति त्याला सोडते का...........? , आसा सवाल करून तीने वडीलान्ना निरुत्तर केले होते.
                         सकाळइच दार ठोटावल्याच्या आवाजाने जयंतला जाग आली. होय ती निशाच होती. पलिकडचा आवाज ऐकुण क्षणभर त्याला आश्चर्यच वाटले . त्या विवंचनेत त्याने दार उघडले . तो काही म्हन्न्या आधीच ती घरात शिरली .' मला वाटतं , तुला राग आला असावा'. तो म्हणाला , 'अरे त्या माश्यला कधी पाण्याचा राग येतो का ? माझा तर आत्मा तुझ्यात गुन्तलाय, ' पण .......' त्याचे वाक्य अर्धवट ठेवित ती म्हणाली , 'जर तुला दृष्टी मीळली , तर करशील ना माझ्याशी लग्न?' या प्रश्नाने जयंताला निरुत्तर व्हावे लागले , निशा त्याला एका नामांकित नेत्र तपासणी दवाखान्यात घेउन गेली, तिचे तीने नाटकात कमावलेले सर्व पैषे खर्च केले. तिला पैशाची काळजी नव्हतीच .
               'हळऊ हळऊ डोळे उघळ' तो आवाज त्याला नविन नव्हता . तो आवाज डॉक्तारांचा होता. गेला एक महिना तो तिथे होता. पण डोळे उघळ हे वाकया त्याला नविन होते. त्याने डोळे उघळले हृदयाच्या वाढलेल्या स्पन्दनावर डोळस होण्याचा आनंद स्पर्शुन गेला. त्याने डोळे उघडताच डॉक्तारान्ना निशा बद्दल विचारले . इकडे एका खोलीत निशा काठीचा आधार घेत दाराकडेच येण्याचा प्रयत्न करीत होती. तिला बघताच जयंत थक्क झाला. ' निशा.....' त्याने तिला हाक दिली तीने त्याचा आवाज ओडखला.
                          'आता तरी करशील ना माझ्याशी लग्न?' डोळस झाल्याचा गर्व त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. निशा जयंतला हाक मरितच होती. पण............. प्रतिसाद द्यायला तो तिथे नव्हताच ...................!
                    निशाने स्वतःला सावरले, पण ज्य़ा व्यक्तीसाठी आपण आपले सर्व आयुष्य अन्धकारात टाकले त्या व्यक्तीने तिला विचारले सुद्धा नाही. ही खंत मानत ठेवून निशा जयंत पासून दूर गेली एवढ्या दूर की जयंत निशा पर्यंत क्वचितच पोहचू शकणार, पण जान्या  आधी तीने जयंत साठी एक पत्र त्याच्या दाराशी सोडले.
                    पत्र वाचताच त्याचे डोळ पानवाले . पत्र हातून गडुण, पडले क्षणभर त्याला वाटले की , स्वतःचे डोळ भिंतीवर आधडावे. तो स्वतःलाच दोषी मानु लागला, त्याला रडु आवरत नव्हते , पण ती वेळ या सर्वांची नव्हती त्याने निशाच्या घरची वाट धरली . ते घर ते आंगण त्याला ओळखिचे वाटत होते, पण या पूर्वी त्याने हे कधीच बघितले नव्हते. पण तो सर्व काही समजला होता. दाराजवळ जाताच त्याला कुलुप दिसले , त्याने शेजारी विचारपूस केलि असता त्याला काहीच हाती लागले नाही. त्याला आता पहिल्यांदा नकार दिल्याचा पश्यताप होऊ लागला. तो स्वतःलाच दोष देऊ लागला. त्याच्या डोळयांसमोर पत्रातील ओडी घुटमळत होत्या . पण त्याचा आता काहीही उपयोग नव्हता. त्या ओडी तो वारंवार वाचत होता .
                            
                                     " माझ्या डोळयांची काळजी घे
                                                         तुझीच निशा ......! "


                                                                     
                                                                                लेख by अक्षय पानतावने
                                                                                       अमरावती